विश्वजित श्रीरंग बारणे
मुखपृष्ठ विश्वपर्व परिचय कार्यअहवाल विकासाचा जाहीरनामा
मीडिया प्रचार विजय दिवस पॉडकास्ट नागरिकांचे अभिप्राय
संपर्क

धार्मिक

धार्मिक

केजू देवी मंदिराच्या सुरक्षिततेसाठी तात्काळ निर्णय घेत दुरुस्ती व चौथऱ्याचे काम पूर्ण करण्यात आले. आज मंदिर सुरक्षित आहे आणि भाविक निर्धास्तपणे दर्शन घेत आहेत.

धार्मिक कार्ये धार्मिक कार्ये धार्मिक कार्ये

पर्यावरण

पर्यावरणीय

पवना नदी स्वच्छतेसाठी विशेष स्वच्छता मोहिम राबवण्यात आली तसेच नदी परिसरात मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण करण्यात आले. या उपक्रमामुळे नदीचा परिसर अधिक स्वच्छ, सुंदर आणि पर्यावरणपूरक झाला आहे. निसर्ग संवर्धनाचा संदेश देत नागरिकांमध्ये पर्यावरणाबाबत जागरूकता निर्माण करण्याचा हा एक सकारात्मक प्रयत्न ठरला आहे.

पर्यावरणीय कार्य पर्यावरणीय कार्य पर्यावरणीय कार्य

सामाजिक

श्री दत्त नागरी सहकारी पतसंस्था, मर्या. थेरगाव, लक्ष्मीबाई महिला प्रतिष्ठाण व विश्वजीत श्रीरंग बारणे यांच्या वतीने १० वी व १२ वी माध्यमिक व उच्चमाध्यमिक परीक्षेत उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी “विद्यार्थी गुणगौरव समारंभ” प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह, चिंचवड येथे आयोजित करण्यात आला, तसेच दहावीतील विद्यार्थ्यांसाठी “उत्तम गुणवत्तेसाठी योग्य दिशा” या विषयावर मार्गदर्शन सोहळा घेण्यात आला ज्यातून विद्यार्थ्यांना भविष्यातील शैक्षणिक वाटचालीसाठी प्रेरणा मिळाली, तसेच महिलांच्या सशक्तीकरणासाठी राबवलेले हे उपक्रम समाजासाठी प्रेरणादायी ठरले, महासंसदरत्न खासदार माननीय श्री. श्रीरंग आप्पा बारणे यांच्या वाढदिवसानिमित्त मॅजिक ऑफ सीझर्स व युवासेना यांच्या वतीने आयोजित महिलांसाठी स्वयंरोजगार मेळावा हा स्वावलंबन व आर्थिक सक्षमतेकडे नेणारा स्तुत्य उपक्रम ठरला.

सामाजिक कार्य सामाजिक कार्य सामाजिक कार्य

सांस्कृतिक

सांस्कृतिक

माय मराठीच्या समृद्ध लोककलेचा गौरव करणारा ‘Folk लोक’ - मराठी लोकसंगीताचा भव्य आणि रंगतदार सांस्कृतिक उत्सव मोठ्या उत्साहात आयोजित करण्यात आला. या उत्सवात महाराष्ट्राच्या विविध भागांतील पारंपरिक लोकसंगीत, लोकनृत्य आणि लोककलांचे सादरीकरण करण्यात आले. आम्ही विविध प्रकारचे अनेक सांस्कृतिक उपक्रम सातत्याने राबवत असतो. लोककलावंतांना एक व्यासपीठ मिळावे, तसेच नव्या पिढीला आपल्या मातृसंस्कृतीची ओळख व्हावी, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश होता.

सांस्कृतिक कार्य सांस्कृतिक कार्य सांस्कृतिक कार्य

क्रीडा

क्रीडा

सम्राट मित्र मंडळ, थेरगाव यांच्या वतीने आयोजित थेरगाव प्रिमिअर लीग या भव्य क्रिकेट स्पर्धेची सुरुवात काल वेंगसरकर क्रिकेट अकॅडमी येथे एक गाव, १६ संघ या संकल्पनेतून उत्साहात करण्यात आली, ही थेरगाव प्रिमियर लीग दरवर्षी आयोजित करण्यात येते. तसेच संसदरत्न खासदार माननीय श्रीरंग आप्पा बारणे यांच्या वाढदिवसानिमित्त खासदार चषक या क्रिकेट टूर्नामेंटचे आयोजन करण्यात आले, या स्पर्धांमुळे तरुण खेळाडूंना आपली गुणवत्ता सिद्ध करण्याची संधी मिळाली तसेच क्रीडासंस्कृतीला चालना मिळाली आणि खेळाच्या माध्यमातून संघभावना, शिस्त व सामाजिक एकोपा वाढवण्याचा हा उपक्रम प्रेरणादायी ठरला.

क्रीडा कार्य क्रीडा कार्य क्रीडा कार्य
कार्याचा आढावा
नागरिकांच्या समस्या ऐकून तत्काळ उपाययोजनाविकास म्हणजे फक्त पायाभूत सुविधा नाहीत, तर नागरिकांच्या आरोग्याची सुरक्षा देखील आहे. वाढदिवसानिमित्त ९० दिवसांचे मोफत आरोग्य तपासणी शिबिराच्या माध्यमातून दर्जेदार उपचार व तज्ज्ञ मार्गदर्शन नागरिकांपर्यंत पोहोचवण्यात आले. जनतेच्या आरोग्यासाठी सदैव तत्पर - विश्‍वजीत दादा बारणे
संवाद
दिवाळी म्हणजे फक्त दिव्यांचा सण नाही, ती मनं उजळवणारी, नाती घट्ट करणारी परंपरा आहे. विश्‍वजीत दादा बारणे यांच्या पुढाकारातून आयोजित ‘दिवाळी फराळ कार्यक्रम’ थेरगावमध्ये मोठ्या उत्साहात पार पडला. संवाद, आपुलकी आणि सकारात्मकतेचा दीप प्रज्वलित करणारा हा सोहळा.
सेवा
चांगले रस्ते हाच प्रगतीचा पाया आहे, ही दूरदृष्टी ठेवून विश्‍वजीत दादा बारणे यांनी थेरगावच्या कायापालटाचा ध्यास घेतला आहे. रत्नदीप कॉलनी, समर्थ कॉलनी, गणेशनगर, गुजरनगर, दत्तनगर आणि संदीपनगर परिसरातील खराब रस्त्यांमुळे नागरिकांचे हाल होत होते. ही अडचण ओळखून दादांनी वैयक्तिक लक्ष दिले आणि या सर्व कॉलनींमधील रस्ते आता मजबूत, सुरक्षित आणि चकाचक झाले आहेत.
सेवा
पिंपरी-चिंचवड शहराच्या मध्यभागी सुमारे २५० एकर जागेवर भव्य सेंट्रल पार्क उभारण्याचे नियोजन असून, सध्या पशुसंवर्धन विभागाच्या अखत्यारीतील ही जागा ६० वर्षांच्या भाडेतत्त्वावर पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेकडे देण्याचा प्रस्ताव आहे. या प्रकल्पासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा सुरू असून, जागा नगरविकास विभागाकडे हस्तांतरित करण्याचे प्रयत्न चालू आहेत. संशोधन केंद्र व शेतीला कोणताही धक्का न लावता, लंडन-न्यूयॉर्कच्या धर्तीवर हे पार्क उभारले जाणार असून, वाढती लोकसंख्या व प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या आरोग्य व पर्यावरण संतुलनासाठी हे अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. पार्कमध्ये वॉकिंग व जॉगिंग ट्रॅक, विविध उद्याने आणि मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण असेल.
सेवा
थेरगाव येथे विश्वजीत दादा बारणे यांच्या पुढाकाराने आयोजित 'भव्य मोफत बालजत्रा' उत्साहात पार पडली. या जत्रेत विविध खेळ आणि मनोरंजक उपक्रमांमुळे मुलांच्या चेहऱ्यावर हास्य उमटले, तर पालकांनीही या सोहळ्याचा आनंद लुटला. मुलांच्या कलागुणांना प्रोत्साहन देणारे उत्तम नियोजन आणि प्रसन्न वातावरण यामुळे या कार्यक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
सेवा
विकास म्हणजे फक्त रस्ते-नाले नाहीत, तर श्रद्धेचे संरक्षणही तितकेच महत्त्वाचे आहे. केजू देवी मंदिराच्या सुरक्षिततेसाठी तात्काळ निर्णय घेत दुरुस्ती व चौथऱ्याचे काम पूर्ण करण्यात आले. आज मंदिर सुरक्षित आहे आणि भाविक निर्धास्तपणे दर्शन घेत आहेत. श्रद्धेचा आधार, जनतेचा विश्वास - विश्वजीत दादा बारणे
सेवा
पाच लाख वृक्षांसह थेरगावात आकार घेतोय हरित भविष्याचा संकल्प! हा उपक्रम केवळ वृक्षारोपण नाही, तर पर्यावरण संवर्धन, जैवविविधता वाढ आणि हरित शिक्षणाकडे नेणारा ठोस प्रवास आहे. विश्वजीत दादा बारणे यांच्या पुढाकारातून व खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या मार्गदर्शनाखाली हरित, संतुलित आणि शाश्वत विकासाचा नवा अध्याय.
सेवा
पाच लाख वृक्षांसह थेरगावात आकार घेतोय हरित भविष्याचा संकल्प! हा उपक्रम केवळ वृक्षारोपण नाही, तर पर्यावरण संवर्धन, जैवविविधता वाढ आणि हरित शिक्षणाकडे नेणारा ठोस प्रवास आहे. विश्वजीत दादा बारणे यांच्या पुढाकारातून व खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या मार्गदर्शनाखाली हरित, संतुलित आणि शाश्वत विकासाचा नवा अध्याय.
सेवा
विकास म्हणजे फक्त रस्ते नाहीत, तर नागरिकांच्या सुरक्षिततेची हमीही आहे. आनंदपार्क, थेरगाव येथे बंद पडलेल्या स्ट्रीट लाइट्सची तात्काळ दुरुस्ती करून नागरिकांचा सुरक्षित प्रवास पुन्हा सुनिश्चित करण्यात आला. सुरक्षिततेसाठी सदैव तत्पर - विश्वजीत दादा बारणे
विष्वजित
मी, विश्‍वजीत श्रीरंग बारणे, नगरसेवक पिंपरी चिंचवड महानगरपालिका, युवासेना सचिव (पश्चिम महाराष्ट्र) व युवासेना कोर कमिटी सदस्य म्हणून सामाजिक व राजकीय क्षेत्रात सक्रिय आहे. माझा हा प्रवास मुखपृष्ठ वर मांडलेल्या दृष्टिकोनाशी सुसंगत असून, विकासकामांद्वारे आणि विकासाच्या जाहीरनाम्यात नमूद केलेल्या उद्दिष्टांनुसार पुढे जात आहे.
मुखपृष्ठ विश्वपर्व परिचय कार्यअहवाल विकासाचा जाहीरनामा
मीडिया प्रचार विजय दिवस पॉडकास्ट नागरिकांचे अभिप्राय
संपर्क